गावामध्ये पूर्णपणे बागायत शेती असल्याने शेतीअधारीत उद्योग व रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गावामध्ये बेरोजगारी नाही हे सांगायला अभिमान वाटतो. शेतीपुरक व्यवसायामध्ये दुग्धव्यवसाय, शेळी व कोंबडी पालन हेही व्यवसाय येथे टीकून आहे. शेजारीच गांधीनगर ही महाराष्ट्र व कर्णाटक प्रसिद्ध व्यापारीपेठ असल्याने सुशिक्षीत तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. गांधीनगर मधील कापड व्यापा-यांमुळे शेकडो महिलांना तयार कपडे बनविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. गाबवामध्ये एक साबण कारखाना आहे, दोन ऊस रोपवाटिका आहेत यामधूनही रोजगाराची निर्मिती झाली आहे.
