सर्व रस्ते डांबरी झालेले आहेत, रस्ते स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत चांगले प्रयत्न सुरु आहेत. जिल्हापरिषदेची पूर्व प्राथमिक शाळा आहे. पाच आंगणवाड्या व कै. बाबासाहेब कुचमुरे ट्रस्ट संचलित चिंचवाड हायस्कूल ही माध्यमिक शाळा आहे. कम्प्युटर शिक्षणासाठी दोन खाजगी संस्था काम करत आहेत. गावामध्ये एक व्यायाम शाळा आहे. शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याचबरोबर पाच खाजगी दवाखाने आहेत.
शेती / वनसंपदा
गावचे संपूर्ण बागायत क्षेत्र पंचगंगा नदीच्या काठी आहे. मुख्य पीक म्हणून ऊस व भात असले तरी शेतकरी फळबाग योजनेअंतर्गत केळी उत्पादनाकडे आकर्षित होत आहेत. शेताच्या बांधावरती आंबा, निलगीरी, बाभळ, करंजी, वड, पिंपळ व लइंब अशा प्रकारची झाडे लावून वनराई फुलवली आहे.